बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवीगाळ झाली पण ती कोणी केली यासाठी भास्कर जाधवांची नार्को टेस्ट करा”

मुंबई | महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. केंद्र सरकारने एम्पिरिकल डेट राज्य सरकारला द्यावा, याचा ठराव मंजूर करत असताना अधिवेशनात चांगलाच गोंधळ उडाला. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांचा माईक ओढला व धक्काबुक्की करत शिव्या दिल्या असा ठपका ठेवत आमदारांवर कारवाई देखील करण्यात आली.

भाजपच्या 12 आमदारांवर एक वर्षाच्या निलंबनाची कारवाई यावेळी करण्यात आली. या प्रकरणात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून निलंबित भाजपचे आमदार हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला गेले आहेत. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी या प्रकरणात ट्विट करून सरकारवर निशाणा साधला आहे.

“अध्यक्षांच्या दालनात शिव्या दिल्या गेल्या पण त्या शिव्या नेमक्या कोणी दिल्या? यासाठी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी राज्यपालांकडे करणार आहे”, असं भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून म्हटलं आहे. त्यामुळे आता हे प्रकरण चांगलंच पेटलं असल्याचं पाहायला मिळत आहे.

भाजपच्या 12 आमदारांवर झालेल्या कारवाईमध्ये अतुल भातखळकर, राम सातपुते, गिरीश महाजन, आशिष शेलार या बड्या नेत्यांसह इतरही आमदारांचा समावेश आहे तर ही कारवाई आकसापोटी केली असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More