मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अग्रस्थानी असलेलं नाव म्हणजे महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड, गेल्या 15 दिवसांपासुन संपर्क क्षेत्राच्या बाहेर असलेल्या वनमंत्र्यांनी काल मौन सोडले आणि माध्यमांशी संवाद साधला. संजय राठोड यांनी काल पोहरादेवी येथे केलेल्या वक्तव्यावरून भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
संजय राठोड हे बोटचेप्या ठाकरे सरकारमधील गजा मारणे आहेत. गजा मारणे हा गुंड आणि संजय राठोड हे मंत्री हाच काय तो फरक; समाजाला पायाखाली चिरडणारी यांची मानसिकता सारखीच! असा घणाघात भाजप नेते अतुल भातखळकरांनी केला असून, संजय राठोड यांना तात्काळ अटक झाली पाहीजे, अशी आग्रही मागणी त्यांनी लावुन धरली आहे.
“निर्लज्जपणा आणि बेशरमपणाचा कळस काय असू शकतो हे कालच्या राठोडांच्या वक्तव्यावरून दिसून येतं”, अशी बोचरी टीका भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे, ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. ठाकरे सरकारने शक्ती कायद्याची निरर्थक टिमकी वाजवु नये असंही ते यावेळी म्हणाले.
संजय राठोड काल येऊन मुद्यावर बोलायचं आणि पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं सोडुन फक्त समाजाला भावनिक भुरळ घालुन निघुन गेले. ऑडिओ क्लिप आणि एकंदर पूजा चव्हाण प्रकरणावर त्यांनी चकार शब्दही काढला नसल्याची टीका भातखळकरांनी केली. तसेच, मुख्यमंत्र्यांनी रटाळ फेसबूक लाईव्ह करणे थांबवण्याचा सल्लाही यावेळी देण्यात आला.
थोडक्यात बातम्या-
धक्कादायक! साठ वर्षाच्या ‘या’ खासदाराने केलं 14 वर्षाच्या मुलीसोबत लग्न
चित्राताई ठेचतील या भीतीने नागोबा बाहेर आला- प्रसाद लाड
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शब्दाचे पक्के होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र लबाड”
रायगडावर महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हायचं असेल तर पाळावे लागणार ‘हे’ नियम!
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ‘तो’ व्हिडीओ झाला लीक, संजय राठोडांचा संबंध असल्याचा दावा!