Top News महाराष्ट्र मुंबई

संयम ठेवलाय म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना भाजपचा सवाल, ‘संयम सुटला तर काय कराल?’

मुंबई |  सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव विरोधी पक्ष अप्रत्यक्षपणे घेत आहे. यावरूनच मोठा वादंग माजला आहे. मात्र आदित्य ठाकरेंनी सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रवक्ते आमदार अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरेंनी दिलेल्या स्पष्टीकरणावर सवाल केला आहे.

बॉलिवूडमधील अनेक कलाकार माझे मित्र आहेत तो काही गुन्हा नाही. सुशांत सिंह प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. माझ्याविरुद्ध केवळ गलिच्छ राजकारण सुरू आहे. पण मी संयम बाळगलाय, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत भाजपने त्यांना उलट सवाल केला आहे.

मी आजही संयम ठेवलेला आहे’, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्याचा अर्थ महाराष्ट्रातल्या जनतेने काय घ्यावा?, ही धमकी आहे का? संयम सुटला तर काय कराल याचाही खुलासा केलात तर बरं होईल, असं परखड मत अतुल भातखळकर यांनी व्यक्त केलंय.

 

 

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिश: माझ्यावर तसेच, ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे. मृताच्या टाळूवरचे लोळी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे, असं स्पष्टीकरण आदित्य ठाकरे यांनी सुशांत सिंह प्रकरणात दिलं आहे.

दुसरीकडे कोरोना संकटाने देशभर हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्राचे सरकारही कोरोनाचा पराभव करण्यासाठी शर्थ करीत आहे. बहुधा, महाराष्ट्र सरकारचे यश, लोकप्रियता ज्यांना खुपते त्यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरु केले आहे, असा आरोप करत विरोधी पक्षावर आदित्य ठाकरे यांनी टीकास्त्र सोडलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

चीनमध्ये नव्या व्हायरसचा धुमाकूळ; तब्बल इतक्या लोकांना झालीय ‘या’ व्हायरसची लागण

जेव्हा कमळाचं राज्य येईल तेव्हाच…., राम मंदिर भूमीपूजनावर शत्रुघ्न सिन्हा यांचं ट्विट!

आदिवासी मुले, महिलांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या