“फडणवीसांशिवाय कोरोना झालेल्या मंत्र्यांपैकी एकाही मंत्र्याने सरकारी दवाखान्यात दाखल होण्याची हिंमत दाखवली नाही”
मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली होती. फडणवीस यांनी सरकारी रूग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारला सवाल केला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोना झाल्यानंतर सरकारी हॉस्पिटल भरती झाले. यावरून सत्ताधारी पक्ष आपली आरोग्य यंत्रणा अप्रतिम असल्याचा निर्वाळा देत पाठ थोपटून घेत असल्याचं भातखळकर यांनी म्हटल आहे.
कोरोनाची लागण झालेल्या 16 पैकी एकाही मंत्र्याने शासकीय इस्पितळात भरती होण्याची हिंमत का दाखवली नाही?, असा सवाल अतुल भातखळकरांनी केला आहे.
दरम्यान, आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस कोरोना झाल्यानंतर सरकारी हॉस्पिटल भरती झाले. यावरून सत्ताधारी पक्ष आपली आरोग्य यंत्रणा अप्रतिम असल्याचा निर्वाळा देत पाठ थोपटून घेत आहे.
मग कोरोनाची लागण झालेल्या १६ पैकी एकाही मंत्र्याने शासकीय इस्पितळात भरती होण्याची हिंमत का दाखवली नाही ?— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 26, 2020
महत्वाच्या बातम्या-
“मुख्यमंत्री सावरकरांबद्दल एकही शब्द का बोलले नाहीत? त्यांना नव्या मित्रांची भीती वाटत असावी”
मी तुमचं काय अभिनंदन करू मला अभिनंदन करायचीही लाज वाटत आहे- नितीन गडकरी
देवेंद्र फडणवीसांबाबत असं वक्तव्य करणं योग्य नाही- रोहित पवार
“शिवसेनेचं हिंदुत्व घंटा वाजवणारं हिंदुत्व नाही, मग मित्राच्या पाठीत खंजीर खुपसणारं आहे का?”
4 वर्षांचा चिमुरडा पोहोचला पोलीस स्टेशनमध्ये; तक्रार ऐकून पोलिसही हैराण
Comments are closed.