बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…नाहीतर आधीच्या गृहमंत्र्यांसारखी आपली परिस्थिती होऊ शकते’; ‘या’ भाजप आमदाराचा दिलीप वळसे-पाटलांना इशारा

मुंबई |  पावसाळी विधीमंडळ अधिवेशनाच्या शेेवटच्या दिवशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस सरकारच्या काळात लोकप्रतिनिधींचे फोन टॅप झाल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिलं होतं. त्याप्रमाणे आता गृहमंत्री वळसे-पाटलांनी मोठा निर्णय घेतला आहे.

फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. ही समिती संपूर्ण चौकशी करून तीन महिन्यात आपला अहवाल सादर करणार असल्याची माहिती दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. यावरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी दिलीप वळसे-पाटलांवर निशाणा साधला आहे.

मुंबई शहरात बंदी असताना खुलेआम ड्रोनची विक्री केली जात आहे. हे अत्यंत धक्कादायक असून मुंबई शहरातील कायदा सुव्यवस्था किती रसातळाला पोहोचली आहे हेच याचं निदर्शक आहे. माझी गृहमंत्र्यांना एकच विनंती आहे की फोन टॅपिंगची चौकशी जरूर करा पण त्यासोबत ड्रोन, अंमली पदार्थ आणि महिलांवरील अत्याचार या गोष्टींकडे लक्ष द्या नाहीतर आधीच्या गृहमंत्र्यांसारखी आपली परिस्थिती होऊ शकते हे त्यांनी लक्षात ठेवावं, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

मुंबईच्या डोंगरी विभागातील नूर मंजिल इमारतीत सापडलेले ड्रग्स व हत्यारांच्या कारखान्याचे प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईत विक्रीस बंदी असलेल्या ड्रोन विक्री रॅकेटचा पदार्फाश झाला आहे. मुंबईत अशा प्रकारे दिवसाढवळ्या अंमली पदार्थ, हत्यारं, ड्रोनची विक्री सुरू असताना व मुंबईतील सुरक्षेचे धिंडवडे निघत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपले आहेत का?, असा सवाल करत भातखळकर यांनी गृहमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

”त्या’ साखर कारखान्यांची यादी पाच वर्षापुर्वी अण्णा हजारेंनी केली’; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

मुंबईत सलग 3 दिवस लसीकरण बंद, नागरिकांची गैरसोय; BMC म्हणते…

नाना पटोलेंच्या फोन टॅपिंग प्रकरणावरून वाद पेटला, अजित पवार म्हणाले…

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या!

सातारा जिल्हा बँक ईडीच्या रडारवर; जरंडेश्वर प्रकरणात सातारा जिल्हा बँकेला नोटीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More