Top News महाराष्ट्र मुंबई

‘किती चाटूकरिता कराल मुस्लिम मतांसाठी?’; अतुल भातखळकरांची पवारांवर टीका

मुंबई | दिल्लीतील चालू असलेल्या शेतकरी आंदोलनावर भारतरत्न शेतकरी आंदोलनावर केलेल्या वक्त्याव्याने त्याच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही सचिनला सल्ला दिला होता. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

सचिन तेंडुलकरने क्रिकेट सोडून दुसऱ्या विषयावर बोलू नये पण पवार ब्रम्हांड ज्ञानी असल्यामुळे इतिहासाबद्दल पण बोलणार. किती चाटूकरिता कराल मुस्लिम मतांसाठी?, असं अतुल भातखळकरांनी म्हटलं आहे.

कृषी मंत्री असताना आपलं शेती क्षेत्र सोडून क्रिकेटच्या आयपीएल स्पर्धा भरवलेल्या चालतात पण सचिनने राष्ट्रहिताच्या बाजूने आपलं मत मांडलं “राष्ट्रवादी” काँग्रेसच्या अध्यक्षांना चालत नसल्याचं भातखळकर म्हणाले.

दरम्यान, सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनावर काही भूमिका घेतली असली, तरी सामान्य लोकांमध्ये त्याची प्रतिक्रिया उमटली आहे. त्यांनी वेगळ्या क्षेत्राबद्दल बोलायचं असेल तेव्हा काळजी घेतली पाहिजे, हा माझा सचिनला सल्ला आहे, असं शरद पवार म्हणाले होते.

 

थोडक्यात बातम्या-

“कार्यालयात काम सोडून केस विंचरत बसणं हे गंभीर गैरवर्तन आहे”

कधीकाळी कोहलीसाठी केलेल्या त्या ट्विटमुळं अमिताभ बच्चन यांच्यावर ओढवली नामुष्की!

…म्हणून माझ्यासोबत हे सारं घडतंय; स्वत:च्या गावात धनंजय मुंडे भावुक

“मातृभाषेत शिक्षण देणारं वैद्यकीय, तांत्रिक महाविद्यालय प्रत्येक राज्यात असावं”

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, जोशीमठ धरण फुटल्याने अनेकजण वाहुन गेल्याची भिती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या