Top News महाराष्ट्र मुंबई

“शिवसेनेच्या चेहऱ्यावर जमलेल्या हिरव्या शेवळाची चिंता करा”

मुंबई | शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजवर जोरदार टीका करण्यात आली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर सामनाच्या अग्रलेखातून प्रत्युत्तर देण्यात आलं. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

सत्तेवर असूनही ज्यांच्या तुतारीची पिपाणी झाली त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या सुरांची चिंता करू नये. आजवर महाराष्ट्रात डौलाने फडकणारा भगवा खाली खेचण्याची तुमचे पोलीस हिंमत करतात हे राज्याचे चित्र आहे. शिवसेनेच्या चेहऱ्यावर जमलेल्या हिरव्या शेवळाची चिंता करा, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

फडणवीसांना बऱ्याच दिवसांनी सूर लागला असं वाटत होतं, पण पहिली तान घेताच त्यांना टीकेची उबळ आली आणि सूर बिघडून गेले. कोणत्या वेळी कोणता राग गावा याचं शास्त्र आहे. पण शास्त्रीय गायन सुरू असतानाच ‘डीजे’ लावावा तसं घडलं असल्याचं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं होतं.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी अधिवेशनाच्या अगोदर एक दिवस पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षण, कोरोना काळात झालेला भ्रष्टाचार, इ. मुद्यांवरून ठाकरे सरकारवर टीका केली होती.

 


थोडक्यात बातम्या-

आम्ही शेतकऱ्यांच्या सल्ल्यांवर विचार करायला तयार आहोत पण…-नितीन गडकरी

“शेतकरी आंदोलन तुकडे तुकडे गँगने हायजॅक केलं, काँग्रेस शेतकऱ्यांचं भलं करू शकत नाही”

महाराष्ट्रात आणीबाणी आहे की नाही हे जनता ठरवेल- संजय राऊत

“…तर या नटीबाईची भाजप कार्यालयात खणा-नारळाने ओटी भरावी!”

“…तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकले असत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या