“मुख्यमंत्री महोदय, तुम्ही उद्या म्हणाल मी घराबाहेर पडत नाही तोपर्यंत…”
मुंबई | राज्यातील कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी झाल्याने ठाकरे सरकारने कोरोनाचे सर्व निर्बंध (Corona Restrictions) हटवण्याचा निर्णय घेतला. गेल्या दोन वर्षांपासून लादण्यात आलेल्या सर्व कोरोना निर्बंधांसह ठाकरे सरकारने (Thackeray Goverment) मास्क सक्ती देखील रद्द केली.
आपण मास्क सक्तीकडून निघालो आहोत, मास्क मुक्तीकडे गेलेलो नाही. जोपर्यंत मी आणि उपमुख्यमंत्री मास्क घालतोय तोपर्यंत आपणही सर्वांनी मास्क घालावा, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.
मुख्यमंत्री महोदय, उद्या तुम्ही म्हणाल, मी घरातून बाहेर पडत नाही तोपर्यंत तुम्हीही बाहेर पडू नका, असा टोला अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी लगावला आहे. अतुल भातखळकर यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आल्याचं पाहायला मिळत होतं. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व निर्बंध उठवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला. राज्य सरकारने मास्क सक्तीचा निर्णय मागे घेतला असला तरी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
मुख्यमंत्री महोदय, उद्या तुम्ही म्हणाल, मी घरातून बाहेर पडत नाही तोपर्यंत तुम्हीही बाहेर पडू नका. pic.twitter.com/JkrSY1FQ4d
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 5, 2022
थोडक्यात बातम्या-
रशियन सैनिकांची विकृत मानसिकता; धक्कादायक माहिती समोर
दोन मुलांचा पिता असलेला ‘हा’ अभिनेता आहे रश्मिकाचा क्रश, नाव वाचून तुम्हालाही बसेल धक्का
लोकल प्रवाशांसाठी रेल्वेने घेतला अत्यंत महत्त्वाचा निर्णय
जो बायडन यांनी पुतिन यांना दिला गंभीर इशारा, म्हणाले…
“कोरोना काळात पुण्याला कोण पळून गेलं होतं हे सर्वांना माहिती”
Comments are closed.