Top News तंत्रज्ञान देश

30 मिनिटात चार्ज होणार, 400 किमी धावणार, Audiची जबरदस्त इलेक्ट्रिक कार!

Picture Courtsey: Pixabay

नवी दिल्ली | ऑडी आता भारतात त्यांची पहिली इलेक्ट्रॅानिक कार लाँच करणार आहे. या कंपनीने 3 दिवस आधी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एसयूवी ई-ट्रॉन ट्रीजर अपलोड केला आहे. या गाडीच्या लाँचिंगची घोषणा 2019 मध्ये करण्यात आली आहे.

या गाडीची डिजाईन आधीच्या गाडीसारखीच असून यात फारसे बदल करण्यात आलेले नाहीत. या गाडीच्या डिजाईनमध्ये सिंगल लाईट फ्रेम ग्रिल, हेडलाइट आणि टेललाइटची सुद्धा झलक पहायला मिळाली आहे.

ई-ट्राॅन या गाडीत 2 इलेक्ट्राॅनिक मोटर्सचा वापर वापरण्यात आला आहे. चार्ज केल्यानंंतर 400 किमीपर्यंत ही कार चालेल, असा दावा कंपनीने केला आहे. ही गाडी चार्ज करण्यासाठी 11KW आणि 22KW चे चार्जर वापरल्यास 4.5 ते 8.5 तास लागतील. मात्र या कंपनीने एक पाॅवरफुल 150KW चार्जराचा प्रयोग केला आहे.

दरम्यान, या गाडीच्या इंटेरिअर डिजाईन संदर्भात आद्दाप काही माहिती मिळाली नाही. मात्र याची इंटेरिअर डिजाईन इंटरनॅशल पद्धतीची असण्याची शक्यता आहे.

 थोडक्यात बातम्या-

रोहित पवार-अहिल्याबाईंसंदर्भात शरद पवार असं काय बोलले?, ज्यामुळे होतेय जोरदार टीका

“…त्या मतदारसंघात जाऊन निवडणूक लढवणं यात पुरुषार्थ आहे का?”

‘पडळकराचं वय किती पवारसाहेबांचा अनुभव किती’; जयंत पाटलांचा पडळकरांना टोला

अमृता फडणवीसांच्या नवीन गाण्यावर आमदार महेश लांडगे म्हणाले…

‘अशा’ लोकांवर जबरदस्त दंड ठोठवायला हवा- मकरंद अनासपुरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या