बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

15 ॲागस्टची सुट्टी ठरली दुर्देवी, मुलाच्या डोळ्यादेखत आईनं सोडला जीव

पुणे | काल लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अनेकजण सुट्टीचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडलेले पाहायला मिळाले. मात्र काल सुट्टी साजरी करण्यासाठी बाहेर पडलेल्या एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पुण्यातील एक कुटुंब काल स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पानशेत धरणावर फिरण्यासाठी गेलं होतं. मात्र हे फिरणं त्यांच्या जीवावर बेतलं आहे. योगेश देशपांडे नावाचे व्यक्ती हे आपल्या पत्नी समृद्धी आणि मुलासोबत पानशेत धरणाजवळील रस्त्यावर वरून जात होते. कारवरील नियंत्रण सुटल्यामुळं कार थेट धरणात बुडाली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला असून तर पती आणि मुलगा थोडक्यात बचावले.

ही घटना काल दुपारी घडली असून तेथील जवळच्या नागरिकांनी आवाज ऐकताच मदतकार्यासाठी ते धावत आले. त्यांनी दोरीच्या मदतीनं गाडी बाहेर काढत समृद्धी यांनाही गाडीतून बाहेर काढलं आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचार सुरु करण्याच्या पहिलेच मृत्यू झाल्याचं डाॅक्टरनं सांगितलं.

दरम्यान, गाडी धरणात पडल्यावर योगेश देशपांडे आणि मुलगा गाडीत पुढे बसलेले असल्यानं त्यांनी गाडीच्या बाहेर उडी घेतली. मात्र समृद्धी या मागे बसल्या होत्या आणि गाडीच्या मागच्या काचाही बंद असल्यानं त्यांना बाहेर पडता आलं नाही. याप्रकरणी पोलीस अजून चौकशी करत आहेत.

थोडक्यात बातम्या –

‘…म्हणून मला देश सोडावा लागला’; अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींनी सांगितलं कारण

आज राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

चिंताजनक! डेल्टा प्लस व्हेरिएंटचे आणखी तीन प्रकार आले समोर

काबूल पडलं, राष्ट्रपती भवन ताब्यात; अफगाणिस्तानची सुत्रं तालिबानच्या हातात

“औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची हीच योग्य वेळ”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More