औरंगाबाद महाराष्ट्र

…म्हणून आईनंच मुलांसह स्वतःच्या हाताच्या धारदार ब्लेडनं नसा कापल्या; खळबळजनक घटना!

औरंगाबाद | कोरोनाच्या काळात अनेक विकृत घटना कानावर पडत आहेत. औरंगाबाद शहरातही असाच काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार घडला आहे. पतीचा कोरोनानं मृत्यू झाला म्हणून पत्नीनं आपल्या जुळ्या मुलांसह स्वतःच्या हाताच्या नसा कापल्याची धक्कादायक घटना शहरातील उस्मानपूर भागात घडली आहे.

प्राप्त माहितीनुसार, समीना यांनी बांधकाम व्यवसायिक रुस्तुम शेख यांच्याशी पंचवीस वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. या जोडप्याला समीर आणि आयशा ही जुळी मुलं होती. मात्र या आनंदी कुटूंबावर कोरोनाची अवकृपा झाली. रूस्तुम यांना कोरोनाची लागण झाल्यानं त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याचा समिना आणि त्यांच्या मुलांना जोराचा धक्का बसला.

रूस्तुमचं काही बरंवाईट झालं तर मी माझ्या मुलांसह आत्महत्या करेन असं समीना म्हणत असल्याची माहिती रूस्तुमच्या बहिणीनं दिली. समिनानं असा काही टोकाचा निर्णय घेऊ नये यासाठी तीचे नातेवाईकही गेली काही दिवस तीच्या सोबत राहत होते. मात्र मंगळवारी जेवण झाल्यानंतर रात्रीच्या सुमारास समिनानं असं काही केलं की सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला.

समिनानं गळफास घेण्यासाठी साडी पंख्याला बांधली, मात्र समीरनं तिला रोखलं. यानंतर तिघांनी सुसाईड नोट लिहिली आणि तिघांनीही आपल्या हाताच्या नसा धारदार ब्लेडने कापून घेतल्या. शेजारील लोकांनी तिघांनाही तातडीनं एमजीएम रूग्णालयात दाखल केलं. मात्र समिना व आयशा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. समीरचा या घटनेत जीव वाचला असून त्याला उपचारासाठी घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

माझं दैवत गेलं…. अनिलभैय्यांच्या जाण्याने राष्ट्रवादीचा आमदार ढसाढसा रडला…!

भूमीपूजन सोहळा पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाले….

धक्कादायक! सांगली जिल्हा कारागृहातील तब्बल 63 कैद्यांना झालीय कोरोनाची लागण

राम मंदिरावर ज्येष्ठ भाजप नेते आणि केंद्रिय मंत्री गडकरींची पहिली प्रतिक्रिया

बरं झालं उद्धव ठाकरेंना भूमीपूजन सोहळ्याचं आमंत्रण मिळालं नाही, नाहीतर…- गिरीश महाजन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या