मुंबई | राज्यात कोरोनाचा धोका वाढत असताना भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. इस्लामपुरात आढळलेले कोरोनाचे पेशंट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्याची शिक्षा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मोदींनी तडकाफडकी जाहीर केलेल्या लॉकडाऊनवर टीका केली होती. त्यांच्या याच ट्विटला रिट्विट करत अवधूत वाघ यांनी ही टीका केली आहे.
इस्लामपूरमध्ये जे झालं ते वाईटच, पण विनाकारण मोदींवर टीका केली तर शिक्षा ही भोगावीच लागेल ना मंत्रीजी, असं अवधूत वाघ यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर आता जोरदार टीका होऊ लागली आहे.
दरम्यान, इस्लामपूर हा जयंत पाटील यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. इथं एकाच कुटुंबाशी संबंधित २५ कोरोनाचे रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
भारतातील मशिदी बंद करा; जावेद अख्तर यांची मागणी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांची नवी स्कीम, इच्छा असेल तर लाभ घेण्याचं आवाहन
महत्वाच्या बातम्या-
‘रामायण’, ‘महाभारता’नंतर आता ‘शक्तिमान’ आणि ‘चाणक्य’ही प्रेक्षकांच्या भेटीला
माझ्या घराचं रुग्णालयात रुपांतर करा; बॉलिवुडच्या या दिग्गज अभिनेत्याकडून मदतीचा हात
दिल्लीत एका धार्मिक कार्यक्रमाला गेलेल्या 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
टेलिग्रामवर सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच पुढील लिंकवर क्लिक करा-https://t.me/thodkyaatNews
Comments are closed.