महाराष्ट्र मुंबई

…तर मनसैनिक शांत बसणार नाही; अविनाश जाधव यांचा सरकारला इशारा

मुंबई | राज साहेबांसोबत काही अनुचित प्रकार घडला तर मनसैनिक शांत बसणार नाही. त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे.

कोहिनूर मिल प्रकरणी राज ठाकरेंची आज ईडीकडून चौकशी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेच्या अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यामध्ये मनसेचे नेते संदिप देशपांडे, अविनाश जाधव, आशिष डोके, रविंद्र सोनार, रवी मोरे यांना पालिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सरकारने महाराष्ट्रात दडपशाही सुरू केली आहे, असं म्हणत अविनाश जाधव यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे, अशी प्रतिक्रिया संदिप देशपांडे यांनी दिली आहे

 

महत्वाच्या बातम्या-

-राज ठाकरे चौकशीसाठी ईडी कार्यालयाकडे रवाना

-काँग्रेसला मोठा झटका; विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचा विजय

-राजकारण फार काळ टीकत नाही; बहु भी कभी सास बनती है- बाळा नांदगावकर

-ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे- संदिप देशपांडे

-मनसे पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड; संदिप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या