बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यापूर्वी चुकुनही करू नका ‘ही’ चूक

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची समोर येणारी आकडेवारी सर्वांचीच चिंता वाढवणारी आहे. कोरोनाला रोखण्यासाठी केंद्रासह सर्वच राज्यांतील सरकारकडून सतर्कता बाळगली जात आहे. मात्र, कोरोना (Corona Virus) विरोधातील लढ्यात लस (Vaccine) हे सर्वात मोठं शस्त्र असल्याचं मानलं जात आहे.

देशात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना आता कोरोना लसीचा बूस्टर डोस (Booster Dose) दिला आहे. तर 5 वर्षांवरील मुलांनाही कोरोना लस देण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, लस घेताना बहुतेक नागरिकांकडून होत असलेल्या मोठ्या चुकीबद्दल सरकारने लोकांना सावध केलं आहे.

कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर लाभार्थ्यांनी दुसऱ्या डोस शेड्युल करणं आवश्यक आहे. मात्र, दुसरा डोस घेताना तोच मोबाईल नंबर देणं आवश्यक आहे जो पहिला डोस घेताना वापरला होता. जर लाभार्थ्याने दुसऱ्या डोसवेळी वेगळा नंबर वापरला तर दुसरा डोसही पहिला म्हणूनच मानला जाईल, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, एकाच लाभार्थीला टॅग करून पहिल्या आणि दुसऱ्या डोसचे तपशील देण्यासाठी मोबाईल क्रमांक ही एकच यंत्रणा आहे. दुसऱ्या डोससाठी वेगळा नंबर वापरून लसीकरण शेड्युल केले तर तो आपोआप पहिला डोस म्हणून ओळखला जातो. त्यामुळे दोन्ही डोससाठी एकच नंबर वापरण्याचं आव्हान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

उष्णतेच्या लाटेसह राज्याला अवकाळी पाऊस झोडपणार, ‘या’ जिल्ह्यांना इशारा जारी

‘जेव्हा आदित्य ठाकरेंना तुरूंगात टाकण्यात येईल तेव्हा…’; नवनीत राणांना संताप अनावर

देशातील महागाईचं सदाभाऊ खोत यांनी केलं समर्थन, म्हणाले…

“NIA कारवाईतून दिग्गज नेत्यांची नाव उघड होणार”

मुंबईचं टेन्शन वाढलं! फाॅर्मात असलेला हुकमी एक्का स्पर्धेबाहेर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More