कौतुकास्पद! दूध विकणाऱ्या महिलेची मुलगी बनली आयएसएस, देशात मिळवली 12वी रॅंक
बिहार । केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला आहे. हिसारमधील दूधविकणाऱ्या महिलेच्या मुलीने या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं आहे. यामुळे देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या मुलीचं नाव कल्पना असून ती हरियाणा राज्यातील हिसार जिल्हातील रहिवासी आहे.
कल्पनाची आई राजमाला या आझाद नगरमध्ये दुधाचा व्यवसाय चालवतात. मुलीच्या यशामुळे कल्पना यांची आई खूप आनंदी आहे. तसेच तिच्या कुटुंबियांकडून आझाद नगर परिसरात मिठाई वाटून आंनद साजरा केला जात आहे. अभिमानास्पद बाब म्हणजे कल्पना यांनी कुठेही विशेष प्रशिक्षण न घेता या परिक्षेत देशात 12 वी रॅंक मिळवली आहे.
तिच्या यशाबद्दल बोलताना कल्पनाची आई म्हणाली की, कल्पना लहानपणापासून हुशार होती. आज तिच्या मेहनतीच फळ तिला मिळालं आहे. तसेच आमच्या कष्टाचं तिने चीज केलं आहे. त्यामुळे समाजापुढे तिच्या या यशामुळे एक नवा आदर्श तिने निर्माण केला आहे. तिचा हा आदर्श प्रत्येकाने डोळ्यासमाेर ठेऊन अभ्यास करावा आणि अशा प्रत्येक परीक्षेत मुलींनी यश मिळवावं.
दरम्यान, कल्पना यांची आई राजबाला हिसारमध्ये स्वत: दूध डेअरी चालवते. तर त्यांचे वडील सिवानीमध्ये लेखापाल आणि भाऊ रोहतकमध्ये एमबीबीएसमध्ये इंटर्नशिप करत आहे.
थोडक्यात बातम्या-
“भाजप काँग्रेसचं नाव पुसायला निघाल्यामुळेच राज्यपालसुद्धा पंडित नेहरुंबद्दल काहीही बरळतात”
“राज्यपालांचा जो मान ठेवला पाहिजे त्याला धक्का देण्याचं काम केलं जात आहे”
घाई करा! आगामी काळात सोन्याचे दर दुप्पट होणार, वाचा आजचे दर
शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी
काय सांगता! कुत्रा मागे लागताच रेड्यानी ठोकली धूम, व्हिडीओ पाहून तुम्हीही हसाल पोट धरून
Comments are closed.