बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डाळिंब निर्यातीवर लॉकडाऊनची कुऱ्हाड; कोट्यवधींची उलाढाल ठप्प

सांगली | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. तसेच हळूहळू आता निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात झाली आहे. पण लॉकडाऊनकाळामध्ये अनेकांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. असंच सांगलीतील डाळिंब निर्यातीवर लॉकडाऊनमुळे मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे.

सांगलीच्या आटपाडी तालुक्यातून डाळिंबाची युरोपियन राष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात होत असते. परंतु, यापूर्वी अवकाळी पावसामुळे ही निर्यात होऊ शकली नव्हती कारण अवकाळी पावसामुळे डाळिंबाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं.

दरम्यान, एप्रिलमध्ये दरवर्षी युरोपियन राष्ट्रात डाळिंबाची निर्यात होत असते. पण लाॅकडाऊनमुळे यंदा स्थानिक बाजारपेठ बंद होती आणि निर्यात करण्यासही कोणत्याही प्रकारची सुविधा नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांचं कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. आटपाडी तालुक्यातून जवळपास 2 कोटी रुपयांची उलाढाल डाळिंब निर्यातीतून होत असते. परंतु लाॅकडाऊनचा या निर्यातीवर मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यात जरी होऊ शकली नाही, तरी स्थानिक बाजारपेठेत डाळिंब काही प्रमाणात विक्री होऊ शकतात. पण स्थानिक बाजारपेठही बंद असल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच त्यांना कोट्यवधींचा फटका देखील बसला आहे.

थोडक्यात बातम्या –

ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढली; मराठा समाजापाठोपाठ आता ओबीसी समाजाचा राज्यव्यापी मोर्चा

वेल डन छेत्री! दिग्गज मेस्सीला मागे टाकत भारतीय सुनिल छेत्रीची दुसऱ्या स्थानी झेप

मंडपात नवऱ्याला बघताच नवरीने केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

कोरोनामुळे ‘या’ महापालिकेतील तब्बल 19 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

 हाय अलर्ट! ‘या’ जिल्ह्याला हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा; पुढचे 2 दिवस धोक्याचे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More