मुंबई | विश्व हिंदू परिषदेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येत येऊ नका असं बजावलं. यावर काँग्रेस मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण करत विश्व हिंदू परिषदेवर निशाणा साधलाय.
विश्व हिंदू परिषदेने जास्त वळवळ करु नये. विश्व हिंदू परिषद धर्माचे मालक नाहीत, त्यांनी जास्त वळवळ करु नये, विश्व हिंदू परिषदेत केवळ हिंदू नाव आल्याने धर्म त्यांचा झाला का? आम्ही हिंदू नाही का?, असा सवाल वडेट्टीवार यांनी केलाय.
अयोध्या कोणाच्या बापाच्या मालकीची नाही. विश्व हिंदू परिषदेने राष्ट्रीय भानगडीत पडू नये, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
कोणी कोणाला रोखू शकत नाही, हिंमत असेल तर रोखून दाखवावं. ज्या दिवशी वाटेल तेव्हा उद्धव ठाकरे जातील. हा प्रश्न धार्मिक भावनेचा आहे, असंही विजय वडेट्टीवार म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
“शिवसेना बदललेली नाही, आजही गुंडा पार्टीच आहे”
‘मी माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो….’; नाथाभाऊंनी केला मोठा गौप्यस्फोट
“…म्हणून कंगणा राणावतला Y+ सुरक्षा दिली
चिंताजनक! पिंपरी- चिंचवड शहरात पुन्हा वाढला कोरोनाचा आकडा
‘मुंबईच्या महापौरांनी SRA सोसायटीतील फ्लॅट बळकावला’; भाजपचा गंभीर आरोप
Comments are closed.