बंगळुरु | कर्नाटकात विश्वासदर्शक ठरावात कमी मतं पडल्याने कुमारस्वामी सरकार कोसळलं आहे. मात्र आता याठिकाणी भाजप केव्हा सत्ता स्थापनेचा दावा करणार यावर एका फॅक्टरचा प्रभाव असल्याची जोरदार चर्चा आहे.
ज्या फॅक्टरची सध्या एकच चर्चा आहे तो फॅक्टर म्हणजे ज्योतिष्यशास्त्र; दाक्षिणात्य राजकारणात ज्योतिषशास्त्राचा मोठा प्रभाव असून ते पाहिल्याशिवाय कोणताही निर्णय तिथले अनेक राजकारणी घेत नाहीत.
भाजपचे नेते बी. एस. येडियुरप्पा याला अपवाद नाहीत. त्यांना ज्योतिष पाहण्याची सवय आहे, त्यामुळे सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी जाताना किंवा बहुमत चाचणी घेण्याची वेळ ठरवण्यासाठी ते ज्योतिष पाहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, बहुमत सिद्ध न करता आल्याने कुमारस्वामी सत्तेवरुन पायउतार झाले आहेत, ते लवकरच राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करतील.
महत्त्वाच्या बातम्या-
काँग्रेस-जेडीएस सरकार कोसळल्यानंतर आता पुढं काय होणार???
–कर्नाटकात ‘काँग्रेस-जेडीएस’चं सरकार कोसळलं
-जगनमोहन रेड्डींनीही फॉलो केला ‘राज ठाकरे पॅटर्न; घेतला ‘हा’ मोठा निर्णय
-‘तुला पाहते रे’ या मालिकेसाठी सुबोधला मिळत होतं ‘इतकं’ मानधन
-“आम्हाला वाटलं नव्हतं आदित्य ठाकरे येतील अन् प्रश्न लगोलग सुटेल”
Comments are closed.