पुणे | आणीबाणी सदृश्य भय लादण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही, असं ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
मी 70 वर्ष चळवळीमध्ये असून सरकार साधे बोलण्यास तयार नाही. यामुळे आमच्या अडचणीमध्ये वाढ होत आहे. यामुळे अनेक प्रश्न निर्माण होणार आहे. हे सरकारने लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे, असंही बाबा आढावा म्हणाले.
देशभरात अनेक तज्ञ मंडळी आहे. मात्र त्यांच्यासोबत आजवर कोणत्याही प्रकारची चर्चा केली नाही. दिल्लीमध्ये बोलावा ना, आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, असं बाबा आढाव म्हणाले.
दोष केवळ जुन्या कायद्यांचा आहे का, त्या कायद्याच्या अपुरेपणाचा आणि तुमच्या नाकर्तेपणाचा आहे, असा सवाल बाबा आढाव यांनी उपस्थित केलाय.
थोडक्यात बातम्या-
राजू शेट्टी मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील कार्यालयावर काढणार मोर्चा
भाजपमध्ये दहापेक्षा जास्त आमदार नाराज, राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती होणार- जयंत पाटील
आरे वनाविरोधी असलेल्या लोकांना उकळ्या फुटण्याचं कारण नाही- जयंत पाटील
राजकीय पक्ष बाजूला ठेवत आपण ऊसतोड कामगारांसाठी काम करुया- सुजय विखे पाटील
“थुंकू नका लिहिलेलं असलं तरी लोकं तिथेच थुंकतात; ठाकरे सरकारचंही असंच झालंय”