“बाबा तुम्ही राबडी देवींची माफी मागा”

नवी दिल्ली | केंद्रीय मंत्री व लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष राम विलास पासवान यांच्यावर त्यांची मुलगी आशा पासवानाने जळजळीत टीका केली आहे.

राम विलास पासवान यांनी राबडी देवींवर टीका करताना त्यांना अंगठाछाप मुख्यमंत्री म्हटले होते, त्यावरुन आशा पासवान भडकल्या आहेत व आपल्या वडिलांना राम विलास पासवान यांना माफी मागण्यास सांगितले आहे.

माझ्या बाबांनी राबडी देवींचा अपमान केला आहे. माझी आईपण अशिक्षित होती त्यामुळे माझ्या आईलाही त्यांनी सोडले व दुसरे लग्न केले, असं ती म्हणाली.

दरम्यान, आशा पासवान ही राम विलास पासवान यांची पहिली बायको राज कुमारी देवी यांची मुलगी आहे.  

महत्वाच्या बातम्या-

-दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या मुलीचं अपहरण करण्याची अज्ञाताकडून धमकी

-मोदी सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत- शरद पवार

-राष्ट्रवादीमध्ये मोठी घरवापसी होणार? अजित पवारांचे संकेत

-भाजप दंगली घडवणारं सरकार- प्रकाश आंबेडकर

-…तर मला भर चौकात फाशी द्या- धनंजय मुंडे