बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अतिवृष्टीग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करा”

मुंबई | राज्यात सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने तर नको नको केलं आहे. या ठिकाणची काही गावंही पाण्याखाली गेली आहेत. या पावसामुळे पेरणी करण्यात आलेली सोयाबीनसह इतर पिके पिवळी पडत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पंचनामे करत शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली आहे.

शेतकरी संकटात असताना पुन्हा अस्मानी संकटाने शेतकऱ्यांवर खूप मोठा आघात केला आहे. अशा परिस्थितीत अतिवृष्टीग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यात यावी, अशी मागणी बबनराव लोणीकर यांनी  केली आहे.

शेतकऱ्यांना मदत करायची किंवा नाही ते सरकार ठरवेल तुम्ही पंचनामे तात्काळ करा, अशी सूचना लोणीकर यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह प्रशासनाला केली आहे. भाजपच्या शिष्टमंडळाने लोणीकर यांची भेट घेऊन अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्याचे अद्याप शासनाने आदेश दिले नाहीत, ही बाब निदर्शनास आणून दिली होती.

दरम्यान, अतिवृष्टी गारपीट ढगफुटी भूकंप यासारखी नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास सरकारने सजग राहून तात्काळ पंचनामे करण्याबाबत आदेश देणे आवश्यक आहे. परंतु महाविकास आघाडी सरकारने अद्याप कोणत्याही प्रकारचे पंचनामे करण्यासंदर्भात आदेश दिले नाहीत. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला महाविकास आघाडी सरकार काहीही करत नाही.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More