“माफ करा बाबासाहेब… आमची लायकीच नाही”; हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत
पुणे | भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर आपापल्या पद्धतीनं सर्वांना शुभेच्छा देत आहेत. अशातच अभिनेत्री हेमांगी कवीची पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
मानवी हक्क आणि समाजहितासाठी तुम्ही सांगितलेल्या गोष्टी अंमलात आणायची आमची लायकीच नाही. जमलं तर माफ करा बाबासाहेब, असं हेमांगी कवी आपल्या पोस्टमध्ये म्हणाली आहे. हेमांगीच्या या पोस्टमुळं सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे.
हेमांगी कवीनं याअगोदरही विविध विषयांवर आपलं परखड मत मांडलं आहे. हेमांगीनं बाबासाहेब यांच्याबाबत उत्तम लिखाण केलेल्या काही पोस्ट देखील शेअर केल्या आहेत. अशात आता हेमांगीच्या पोस्टमुळं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता देखील आहे.
दरम्यान, बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं हेमांगी कवीनं केलेल्या पोस्टमुळं परत एकदा समतेच्या विचारांचा मुद्दा चर्चेत आला आहे.
पाहा पोस्ट –
थो़डक्यात बातम्या –
“…हा तर राष्ट्रवादीचा ट्रॅक रेकाॅर्ड”; फडणवीसांची शरद पवारांवर घणाघाती टीका
“शरद पवार जातीवादी नाहीत”; पवारांवर केंद्रीय मंत्र्याची स्तुतीसुमनं!
Russia-Ukraine War| युक्रेनसाठी अमेरिकेने उचललं मोठं पाऊल
वकील गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील फरार
रणबीरच्या आधी ‘या’ अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं होतं आलियाचं नाव
Comments are closed.