…नाहीतर या सरकारला तलवारीने छाटा- बच्चू कडू

चंद्रपूर | शेतकऱ्यांशी बेईमानी करणाऱ्या सरकारला एकतर मतांनी मारा किंवा वेळ पडली तर तलवारीने छाटा, असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलंय. राजुरा तालुक्यात आयोजित शेतकरी कर्जमुक्ती परिषदेत ते बोलत होते.

मी बोलतोय इथून जवळ नक्षलवादी आहेत. त्यांची संख्या कमी झालीय ही चांगली बाब आहे. मात्र शेतकऱ्यांनी नक्षलवादी बनू नये, याची काळजी सरकारने घ्यावी, असंही बच्चू कडू यावेळी म्हणाले. 

दरम्यान, राजुरामध्ये आयोजित शेतकरी कर्जमुक्ती परिषदेला हजारो शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली. कॉम्रेड अजित नवलेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या