फडणवीस आणि विखे पाटलांमधील प्रेम राधा-कृष्णासारखं!

अहमदनगर | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील प्रेम राधा-कृष्णासारखं आहे. त्यामुळे राज्यात विरोधी पक्ष तरी राहिलाय का?, अशा शब्दात आमदार बच्चू कडू यांनी टीकास्त्र सोडलं.

नेवासा तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्ष, सुकाणू समिती, शेतकरी कामगार पक्षातर्फे आयोजित “एल्गार’ मेळाव्यात बच्चू कडू बोलत होते.

सरकारला नमविण्यासाठी शेतकरी येत्या १४ ऑगस्टला राज्यात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. ही कर्जमाफी मान्य नाही. ३ वर्षांत शेतकऱ्यांना लुटले, त्याचाच हिस्सा मागत आहोत, असंही बच्चू कडू यावेळी म्हणाले.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या