बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केंद्रात काही नेते फक्त भाषणं देतात, गडकरी प्रामाणिकपणे काम करतात- बच्चू कडू

बुलडाणा | केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहलं होतं. त्यात महाराष्ट्रात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे होत असलेल्या कामात शिवसैनिक अडचणी आणत असल्याची माहिती दिली होती. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नितीन गडकरींची प्रंशसा केली आहे. ते शेगाव मध्ये बोलत होते.

केंद्रातील वरिष्ठ नेत्यांबद्दल बोलताना ते म्हणाले की, बाकीचे नेते फक्त भाषणं देतात, मात्र केंद्रात नितीन गडकरी प्रामाणिकपणे काम करतात, असं म्हणत बच्चू कडू यांनी नितीन गडकरी यांच्यावर स्तुतीसमने उधळली आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा 17 तारखेला सुरू होतील असं सांगितलं होतं. शाळा पुन्हा सुरू होतील असे संकेत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही दिले होते. परंतु या निर्णायाला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, 17 तारखेला शाळा सुरू करण्याबाबतच्या निर्णयाला काही मंत्री आणि आरोग्य विभागाचा आक्षेप होता. त्यामुळेच मुख्यमंत्री यांनी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, गडकरींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जे पत्र लिहिलं आहे, ते राजकीय दबावाखाली तर नाही ना लिहलं आहे. कारण मागील 25 वर्षें त्यांच्यासोबत होते. त्यावेळी त्यांना काही अडचण आली नव्हती, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गडकरींवर निशाणा साधला होता.

थोडक्यात बातम्या-

पुण्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल, वाचा पुण्याची आजची आकडेवारी!

“उद्धव ठाकरे सुसंस्कृत नेते पण धुक्यात त्यांनी भलत्याच व्यक्तीचा हात धरला”

“महाराष्ट्रात असा वणवा पेटवू की त्याची धग दिल्लीत पोहोचली पाहिजे”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेे हे आमचे नेते, माझं त्यांच्यावर खूप प्रेम- दत्तात्रय भरणे

‘बचपन का प्यार’ गातानाचा रानू मंडलचा व्हिडीओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More