अकोला | शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बनावट कागदपत्रे बनवून शासकीय निधीचा गैरवापर केला असल्याचा गंभीर आरोप वंचित बहूजन आघाडीकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
राज्यपालांनी सर्व कागदपत्रे तपासून बच्चू कडूंविरोधात खटला चालवण्याचे निर्देश दिले. याबाबतची माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी दिली. तर बच्चू कडू यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
बच्चू कडू यांच्यावर आरोप झाल्यानंतर ते तातडीने अकोला दौऱ्यावर गेले. रस्त्याची पाहणी केल्यानंतर बच्चू कडू यांनी पुंडकरांवर निशाणा साधला आहे. मी एक रूपया जरी खाल्ला असेल तर मी धैर्यवर्धन पुंडकर यांच्या घरासमोर हात कलम करेल, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे.
दरम्यान, पुंडकर यांना वेगळ्या चष्म्याची गरज आहे. पुंडकरांनी बाळापूर येथील पंचशील संस्था हडप केली आहे. ते वंचित सोबत राहून दलितांवर अन्याय करतात. वंचितच्या गृहमंत्र्याला बाहेर काढा, असा पलटवार बच्चू कडू यांनी पुंडकरांवर केला आहे.
थोडक्यात बातम्या-
“पुतीनचा बिघडला आहे ब्रेन म्हणून परेशान आहे युक्रेन”
‘आमरण उपोषण मागे घेणार नाही’; संभाजीराजेंनी स्पष्टच सांगितलं….
“अमित शहांना जेलमध्ये टाकलं, नरेंद्र मोदींचा छळ केला तेव्हा आम्ही असेच आरोप केले होते का?”
“चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे असतात हे कायम लक्षाच ठेवा”
…म्हणून ‘या’ टेनिसपटूला आपल्या एक्स गर्लफ्रेंडला दरमहा द्यावे लागणार दीड लाख रूपये
Comments are closed.