Loading...

लांडगे-जगताप ‘वंचित’; मुख्यमंत्र्यांनी बाळा भेगडेंना दिला मंत्रिपदाचा नजराणा

मुंबई |  भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय उर्फ बाळा भेगडे यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. पण, गेली साडे चार वर्षे मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत असलेले पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे हे मात्र वेटींग लिस्टमध्येच राहिलेत.

पिंपरी- चिंचवड महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवल्यानंतर लक्ष्मण जगतापांना मंत्रिपद मिळेल अशी त्यांच्या समर्थकांना आशा होती. मात्र, लोकसभेला चांगली कामगिरी करा मग तुमचा विचार करू असं त्यांना सांगण्यात आलं.

Loading...

शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना चांगलं मताधिक्य मिळालं. जगतापांना मंत्रिपदाच्यात रुपात  बक्षिस मिळण्याची आशा होती. तर दुसरीकडे महेश लांडगेही मंत्रिपद मिळेल या आशेवर होते. मात्र ही प्रतीक्षा 2019 च्या विधानसभेपर्यंत लांबणीवर पडणार आहे.

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा म्हणजे बाळा भेगडेंचा लाभ झालाय. पावणे पाच वर्षांची प्रतिक्षा आता संपलीये. मदन बाफना यांच्या नंतर तब्बल 25 वर्षांनी मावळ विधानसभा मतदारसंघाला मंत्रिपद मिळालं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-काँग्रेसचा ‘हा’ आमदार म्हणतो, मी पुन्हा आमदार व्हावं अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा

-नापास होण्याचा आणि आयुष्याचा काहीही संबंध नसतो; राज ठाकरेंचं तरूणांना मार्गदर्शन

-पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहीली सरपंचांना पत्रं; केलं हे आवाहन

Loading...

-प्रकाश मेहतांना भ्रष्टाचाराचं प्रकरण भोवलं; अखेर मुख्यमंत्र्यांनी त्यांना घरी बसवलं

-मोदींमध्ये हिम्मत; आम्ही सर्व मिळून राम मंदिर बांधू- उद्धव ठाकरे

Loading...