महाराष्ट्र मुंबई

वीजबिल भरू नका, काय होतं ते पाहू पुढे- बाळा नांदगावकर

मुंबई | मनसेने राज्यातील जनतेला वीजबिल न भरण्याचं आवाहन केलं आहे. वीजबिल भरू नका. काय होतं ते पाहू पुढे, असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

एकीकडे सरकार निर्णय घेऊ म्हणून सांगत आहे आणि दुसरीकडे राज्याचे मंत्री वाढीव बिल माफ केलं जाणार नसल्याचं सांगतात. तुमच्यातच एकोपा नसेल तर लोकांनी त्याचा भुर्दंड का सोसायचा? असा सवाल बाळा नांदगावकर यांनी केलाय.

सोमवारनंतर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आमचे मोर्चे निघतील. सरकारला वाढीव वीजबिल माफ करण्यास आम्ही भाग पाडू. तेव्हाही सरकारने ऐकलं नाही तर पुढे उग्र आंदोलनं करावी लागतील, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे.

पुढची आंदोलनं कशी असतील त्याचं स्वरुप आता सांगता येणार नाही. सरकार आणि जनतेलाही आमची आंदोलनं कशी असतात हे माहीत आहे, असं बाळा नांदगावकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

मुंबई हल्ल्यामागचा सूत्रधार हाफिज सईदला 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्ष

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण!

“…तर कंगणा राणावतला त्वरित अटक करण्याचे मुंबई पोलिसांना अधिकार”

“शरद पवारांच्या शब्दालाही सरकारमध्ये किंमत उरली नाही”

‘नॉटी’ पुरुषांची घाण समाजातून ‘फ्लश’ करु- अमृता फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या