बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बाळासाहेब ठाकरे खरे हिंदूवादी, राज ठाकरे यांच्यात बाळासाहेबांची छबी दिसते”

मुंबई | मराठी माणसाच्या मुद्द्यावर मनसेने गेले 13 वर्ष राजकारण केलं. मात्र, आता राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे आता गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसेमध्ये जवळीक आल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता हिंदुराष्ट्राच्या बांधणीसाठी गुरू माँ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कांचन गिरी आणि सुर्याचार्य आज मुंबईत दाखल झाले आहेत. त्यावेळी कांचन गिरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधाला, तर राज ठाकरे यांंचं कौतुक देखील केलं आहे.

बाळासाहेब ठाकरे जे बोलायचे ते करून दाखवत. ते खरे हिंदूवादी होते. बाळासाहेब वाघासारखे आणि हिंदूंसाठी बोलायचे. उद्धव ठाकरे यांच्याविषयी मला काहीही बोलायचं नाही, कारण त्यांनी आपले वडील बाळासाहेब ठाकरे यांचं नाव बुडवलं आहे, असंही कांचन गिरी यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांच्यात बाळासाहेब ठाकरे यांची छबी दिसते. बाळासाहेब ठाकरे यांचा संकल्प राज ठाकरे पुर्ण करतील. राज ठाकरे यांच्या मनात जो काही पुर्वाग्रह निर्माण झालाय तो मी दूर करेल. राज ठाकरे समजूतदार आहेत. त्यामुळे ते समजून घेतील, असं कांचन गिरी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हिंदूराष्ट्राच्या बांधणीसाठी मी मुंबईत दाखल झाले आहे. मी राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे. उद्धव ठाकरे यांनी मुस्लिमांना सोबत घेऊन पक्ष बनवला. त्यामुळे मी त्यांच्यावर नाराज असल्याचं देखील कांचन गिरींनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

…यांची डोकी ठिकाणावर आहेत का याची चौकशी होणं गरजेचं आहे- संजय राऊत

रेल्वेच्या ‘या’ विभागाने भंगार विकून मिळवले ‘इतके’ कोटी; आकडा वाचून थक्क व्हाल

रोहित पवारांचा महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर, म्हणाले…

‘मी मोठी नेता नसल्याचं पवारसाहेब म्हणाले असतील पण मी…’; पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर

भारताच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्याचं वर्ल्ड बँकेनं केलं तोंडभरून कौतुक, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More