मुंबई | राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये आणखी एक उपमुख्यमंत्री पद निर्माण केलं जाणार असून ते काँग्रेसला मिळणार असल्याची चर्चा आहे. यावर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना ‘आनंदी आनंद गडे, अशी सूचक प्रतिक्रिया बाळासाहेब थोरातांनी दिली आहे. ते मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते.
कोणतंही पद दुय्यम असतं, पण जनतेच्या सेवेसाठी ते महत्त्वाचं असतं. जे मिळालं त्यात आम्ही समाधानी आहोत, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
अशोक चव्हाण यांनीही उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या चर्चेवर भाष्य केलं. राजकारणात ज्या चर्चा होतात ते प्रत्यक्षात होतंच असं नाही. उपमुख्यमंत्री पद काँग्रेसला मिळेलंच असं काही नाही, असं म्हणत अशोक चव्हाणांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे.
दरम्यान, काँग्रेसला निवडणूकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत कमी जागा मिळाल्यामुळे उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे गेलं, त्यात काँग्रेसला तक्रार असण्याचं काहीचं कारण नाही, असंही अशोक चव्हाण यावेळी म्हणाले. .
थोडक्यात बातम्या-
देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंसाठी समर्पित केलं ‘हे’ प्रसिद्ध गाणं!
मुख्यमंत्री इन अॅक्शन मोड; वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांना दिले ‘हे’ आदेश!
लॉकडाऊनसंदर्भात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…
पुण्यातील ‘या’ भागात विद्यार्थ्यांसाठी सरकार 9 मजली भव्य वसतीगृह उभारणार!
‘लिहून घ्या, …त्यानंतर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस’; भाजपच्या या आमदाराने सांगितली वेळ!