मुंबई | शिवसेना पक्षफूटीनंतर शिवसेनेचे काही खासदार देखील पक्षांतर करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त येत होते. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या खासदारांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत, राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) उमेदवार दौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्याचे विनंती पत्र शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) दिले. त्यावर बैठक घेत शिवसेनेने आपला अधिकृत निकाल कळवला. शिवसेना आता दौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार आहे.
शिवसेनेच्या भूमिकेवर आता काँग्रेस नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी भाष्य केेलं. शिवसेना महाविकास आघाडीत (MVA) असून येवढा मोठा निर्णय घेताना त्यांनी आम्हाला विचारलं देखील नाही. त्यांनी आमच्याशी कोणतीही चर्चा केली नाही, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरातांनी ट्विट करत दिली आहे.
राष्ट्रपतीपदाची निवडणूक ही वैचारीक लढाई आहे. लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी सुरु असलेला हा संघर्ष आहे. स्त्री – पुरुष किंवा आदिवासी – बिगरआदिवासी अशी ही लढाई नाही. जे संविधान आणि लोकशाहीच्या बाजूने आहेत ते सगळे यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना पाठींबा देत आहेत. शिवसेनेने दौपदी मुर्मू यांना पाठिंबा का दिला? त्यासाठी त्यांनी काही कारणे देखील सांगितली. परंतु त्यामागची त्यांची भूमिका शिवसेनेचे नेतृत्वच सांगू शकेल, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.
शिवसेना (Shivsena) वेगळा राजकीय पक्ष आहे. ते त्यांची वेगळी भूमिका घेऊ शकतात. मात्र, या वैचारीक लढाईत जेव्हा गैरलोकशाही मार्गाचा अवलंब करुन राज्यातील सरकार पाडले जाते, शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले जाते, अशा वेळी त्यांनी घेतलेली भूमिका अनाकलनिय आहे. शिवसेना महाविकास आघाडीत आहे. परंतु त्यांनी आपल्या या निर्णयाची आमच्याशी चर्चा केली नाही, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
राष्ट्रपती पदाची निवडणूक ही वैचारिक लढाई आहे. लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी सुरू असलेला हा संघर्ष आहे. स्त्री, पुरुष किंवा आदिवासी, बिगर आदिवासी अशी ही लढाई नाही.
जे संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाच्या बाजूने आहेत ते सर्व यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देत आहेत. pic.twitter.com/LSykyJ0b6L— Balasaheb Thorat (@bb_thorat) July 12, 2022
थोडक्यात बातम्या –
ईडी ना काडी, ‘या’ कारणामुळे शितल म्हात्रे शिंदे गटात सामील
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, सीएनजी आणि पीएनजी ‘इतक्या’ रूपयांनी महागलं
‘…त्यामुळे औरंगाबादचं नाव बदलू देणार नाही’, इम्तियाज जलील आक्रमक
नवीन संसद भवनाच्या राष्ट्रचिन्हावरुन वाद, ‘या’ कारणामुळे विरोधक आक्रमक
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठा झटका!
Comments are closed.