बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनिल देशमुखांवर झालेल्या गंभीर आरोपांवर बाळासाहेब थोरातांनी सोडलं मौन, म्हणतात…

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावरून विरोधकांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

अनिल देशमुखांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. आता या प्रकरणावर ठाकरे सरकारमधील मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बाळासाहेब थोरात यांनी या प्रकरणावर बोलताना सावध पवित्रा घेतल्याचं पहायला मिळालं. परमबीर सिंह यांनी जे पत्र दिलं, ते त्यांची बदली झाल्यानंतर दिलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या सर्व विषयाकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्यक्तिशः लक्ष घालत आहेत. त्या पत्राच्या सत्यतेबाबत ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांना शंका वाटत आहे. त्यावेळी या विषयावर आम्ही काही वेगळं बोलणं मला आवश्यक वाटत नाही, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया देत थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांवर निशाणा साधला आहे. परमबीर सिंग यांच्या आरोपांमध्ये तथ्य असल्यास, त्यांचे दावे खरे असल्यास आदरणीय शरद पवारजींना जाब विचारायला हवा. कारण तेच महाराष्ट्र सरकारचे शिल्पकार आहेत. तथाकथित तिसरी आघाडी हेच करणार आहे का?, असा सवाल संजय निरूपम यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘…त्याची संपूर्ण माहिती माझ्याकडे आहे’; नारायण राणेंच्या आरोपाने खळबळ

धक्कादायक! नांदेडमध्ये ग्रामपंचायत निवडणूकीचा वाद टोकाला, तरुणाची दगडाने ठेचून केली हत्या

काँग्रेस काय पाकिस्तानमधून आलेली आहे का?- संजय राऊत

काय सांगता! वय वर्ष 41 मात्र तरीही ‘ही’ अभिनेत्री दिसते इतकी हॉट, पाहा फोटो!

सचिन वाझेंना शिवसेनेत आणणारा ‘तो’ नेता कोण; राज ठाकरेंचा सवाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More