Top News पुणे महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला फटकारल्यावर थोरातांनी केला ‘हा’ सवाल

पुणे | औरंगाबादचा उल्लेख मुख्यमंत्री कार्यालाकडून अधिकृतपणे संभाजीनगर असा केला जात आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया देताना समर्थन दिलं आणि काँग्रेसलाच टोला लगावला होता. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

औरंगाबाद नामांतराबाबत काँग्रेस पक्षाची भूमिका कायम असून ती आम्ही मांडली आहे. पण मुख्यमंत्र्यांना नेमकं काय म्हणायचं आहे ?, त्याबाबत आम्ही आमची भूमिका मुख्यमंत्र्यांना निश्चित पटवून देऊ, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

औरंगजेब हा विषय नाही. छत्रपती संभाजी महाराज हे आमचेही आराध्यदैवत आणि श्रद्धास्थान आहे. पण प्रश्न असा आहे की नामांतराच्या बाबतीत जे राजकारण होतं त्यामुळे माणसात भेद निर्माण होतात ते होऊ नये, म्हणून काँग्रेस विरोध करत असल्याचं थोरातांनी सांगितलं.

दरम्यान, औरंगजेब सेक्युलर नव्हता. त्यामुळे आमच्या कॉमन अजेंड्यामध्ये जो सेक्युलर शब्द आहे त्यात औरंगजेब बसत नसल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

औरंगाबाद नामांतरावर उदयनराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले….

…तर 1 फेब्रुवारीपासून रेशन होणार बंद!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच जाहीरपणे काँग्रेसला फटकारलं, म्हणाले…

रायगडमध्ये वऱ्हाडाचा ट्रक 300 फूट दरीत कोसळून अपघात!

‘रिया चक्रवर्ती माझी..’; रोडिज फेम राजीव लक्ष्मणनं त्या फोटोबाबत दिलं स्पष्टीकरण, म्हणाला….

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या