बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“निवडणुका आणि राजकारण हा तर खेळ, तो काळजीपूर्वक खेळला पाहिजे”

नाशिक | महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी राजकारण आणि निवडणुका याबद्दल बोलताना महत्वाचं वक्तव्य केलं आहे. तर भाजपला दूर ठेवण्यासाठी आम्ही नवी मुंबईत एकत्र येत असल्याचं देखील बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

‘निवडणुका आणि राजकारण हा खेळ आहे, तो काळजीपूर्वक खेळला पाहिजे. राजकारणसुद्धा (Politics) काही बाबतीत खेळासारखंंच आहे. राजकारणातही जय पराजय असतात’, असं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.

राज्यात तीन पक्ष आहेत, त्यात काँग्रेसचे महत्व असल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. अशोक चव्हाण (Ashok Chavhan) बरोबरच बोलले. काँग्रेस (Congress) आहे म्हणूनच सरकार आहे, असं थोरात अशोक चव्हाण यांच्या वक्तव्याचं समर्थन करताना म्हणाले आहेत.

दरम्यान, पटोले अनुभवी नेते आहेत. काँग्रेसच्या मुशीतील आहेत, म्हणूनच ते खासदारकी सोडून काँग्रेसमध्ये आलेत. त्यांना मी सल्ला देणार नाही, असं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले (Nana Patole) यांच्या आक्रमकतेवर बोलताना म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

सचिन तेंडुकरची BCCI एन्ट्री?; सौरव गांगुली म्हणतो…

‘आता सहनशीलता संपत आली, टोकाचं पाऊल घ्यायला लावू नका’; अजित पवार संतापले

TET घोटाळा: राज्य परिक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंच्या अटकेनंतर आणखी दोन जणांना अटक

ST Employee Strike: ‘संप असाच सुरू राहिला तर…’; सरकार ‘या’ मोठ्या कारवाईच्या तयारीत

“आघाडीच्या तिन्ही पक्षांचे नेते घाबरले, कार्यकर्ते बिथरले आहेत आणि….”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More