बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाळासाहेब थोरात एक वर्षाचं तर काँग्रेस आमदार एक महिन्याचं वेतन सीएम रिलीफ फंडात देणार!

मुंबई | कोरोना काळात आरोग्य सुविधांवर वाढलेला खर्च आणि लॉकडाऊनमुळे आटलेला महसूल अशा कात्रीत राज्य सरकार सापडलं आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेसच्या सर्व आमदारांनी त्यांचं एक महिन्याचं मानधन सीएम रिलीफ फंडात देण्याचा निर्णय घेतला आहे. मीही एक वर्षाचं मानधन देणार आहे. तसेच महाराष्ट्र काँग्रेसकडून सीएम रिलीफ फंडात 5 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

सर्वांचे मोफत लसीकरण झालं पाहिजे यासाठी आम्ही आग्रही आहोत. यापूर्वीचे लसीकरणही मोफत झालं आहे. त्यामुळे आम्हीही मोफत लसीकरण करणार आहोत. यावर मोठा खर्च येणार आहे. त्यामुळे मी माझं एक वर्षाचं मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहे, असं थोरातांनी सांगितलं आहे.

जे लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. त्यांनी पाच लोकांच्या लसीकरणाचा भार उचलावा, असं अभियान राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतिक पाटील यांनी सुरू केलं आहे. ते स्वत: त्यांच्या आणि इतर पाच जणांच्या लसीकरणाचा खर्च उचलणार आहेत. हा स्तुत्य उपक्रम असून सर्वांना प्रतिक पाटील यांचं अनुकरण करावं, असं आवाहनही बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘नागडे राजकारणी, नागडं सरकार, नागडा देश, आरे हाड…’; आस्ताद काळेची पोस्ट व्हायरल

“9 लाख 17 हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या खात्यात थेट पैसे जमा केले”

उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीचं आनंद महिंद्रांकडून कौतुक, म्हणाले…

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण!

उद्या बहिणीचं लग्न, आज भावाचा दुर्दैवी मृत्यू; इचलकरंजीतील हृदयद्रावक घटना

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More