बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नारायण राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर बाळासाहेब थोरात म्हणाले….

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर राज्यभरात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. पोलिसांनी त्यांना काल अटक देखील केली होती. राणे जामिनावर बाहेर पडले आहेत. यावर काँग्रेसचे नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे

कालची जी घटना आहे, ती आपण पाहिल तर दुर्दैवी वाटते. ही घटना महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली दुर्दैवी घटना आहे. आपण विरोधी पक्षात असलो तरी, एकमेकांचा सन्मान करायला हवा. राजकारणात टीका करावी लागते परंतु त्याचा स्तर कोणता असावा याचा विचार करावा, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

मुख्यमंत्री हे जनतेचे मानबिंदु असतात, ते जनतेचं प्रतिनिधित्त्व करतात.  नारायण राणेंनी ज्या पध्दतीची भाषा वापरली आहे, मुळात त्याला टीका म्हणता येत नाही, असं थोरात म्हणाले. त्यासोबतच यावेळी बोलताना थोरातांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधींवर केलेल्या टीकेवरही भाष्य केलं आहे.

दरम्यान, भाजपचे मंत्री नैराश्यात आहे. त्यामुळे ते अशी भाषा करत आहेत. मात्र कोणी चुकीचं बोलल तर कारवाई होणारच असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी भाजपला टोला लगावला.

थोडक्यात बातम्या- 

‘अशा’ पद्धतीचं शिक्षण घेण्यास कोणाचाच नकार नसेल, पाहा व्हिडीओ

राखी सावंतला चावला कुत्रा?, पाहा व्हिडीओ

आता संपलं वाट पाहणं!; नेक्सॅानपेक्षा कमी किंमतीत मिळणार टाटांची ‘ही’ नवीन SUV!

कमाल आर खान अडचणीत, मनोज वाजपेयींकडून खटला दाखल!

शांतीचा संदेश देणाऱ्या ‘MIT’मध्ये साध्वी प्रज्ञांचं वेबिनार, विद्यार्थी संघटनांचा विरोध

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More