बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शिवाजीचे उदात्तीकरण: पड्यामागचे वास्तव’ पुस्तकावर बंदी घाला; भाजपची मागणी

नागपूर | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणाऱ्या एका पुस्तकामुळे काही दिवसांपूर्वी मोठा वाद निर्माण झाला होता. आता आणखी एका पुस्तकावरुन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. “शिवाजीचे उदात्तीकरण : पड्यामागचे वास्तव” या पुस्ताकावर भाजपने आक्षेप घेतला असून पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

संबंधित पुस्तकात शिवाजी महाराजांवर अपमानजनक, आक्षेपार्ह आणि सुमार दर्जाचे लेखन करण्यात आले आहे. तसेच या पुस्तकातील प्रत्येक पानावर महाराजांची बदनामी करण्यात आली आहे, असं म्हणत भाजपने आक्षेप घेतला आहे.

विनोद अनाव्रत हे या पुस्तकाचे लेखक आहेत. तर पुस्तकाचे प्रकाशन पुण्याच्या सुगावा प्रकाशनाने केले आहे. पुस्तकाचे लेखक आणि प्रकाशन संस्थेचे मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजपने केली आहे. भाजपचे राज्य प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेत ही मागणी केली आहे.

दरम्यान, यासंदर्भात भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून 19 फेब्रुवारी पूर्वी पुस्तकावर बंदी आणावी, अशी मागणी केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“महाराजांनी फक्त आवाज द्यावा आम्ही संपूर्ण ताकदीनिशी त्यांच्या समर्थनार्थ उतरू”

सैन्यात महिलांनाही समान अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

महत्वाच्या बातम्या-

मागच्या जन्मी पाप केलं तो ‘नगरसेवक’ आणि महापाप करतो तो ‘महापौर’ होतो- देवेंद्र फडणवीस

इंदुरीकर महाराज बोलले त्यात गैर काय?- रुपाली पाटील

शिवसेनेत नाराजीनाट्य!; भास्कर जाधवांनी झटकला राऊतांचा हात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More