बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

औरंगाबाद जिल्ह्यातील तपासणी दौऱ्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी लागु केले ‘हे’ नवे निर्बंध

औरंगाबाद | महाराष्ट्रात सध्या कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र दिसून येत आहे. त्याच पार्श्वभुमीवर अनेक शहरात कडक लाॅकडाउन तर काही शहरात अंशत: लाॅकडाउन करण्याचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आला होता. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात अशाप्रकारेच अंशत: लाॅकडाउन करण्यात आलं आहे.

जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात तपासणी दौरा केला. तपासणी दौऱ्यादरम्यान हाॅटेल्स, ढाबे तसेच परमिट रूम येथे मोेठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आल्याने 17 मार्च पासुन हाॅटेल, ढाबे, परमिट रूम यांंसारख्या ठिकाणी बसुन जेवण करण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी यासंदर्भात आदेश काढले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व बसुन खायला देणाऱ्या ठिकाणांना हा नवा आदेश लागु असून, पार्सल, घरपोच सेवा यावर कोणतेही बंधनं असणार नाही. जिल्ह्यात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन हा नवा नियम लागु करण्यात आला आहे. तसेच प्रशासनाने लागु केलेल्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या हाॅटेल मालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी 17 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत हा नवा नियम लागु केला असुन आता हाॅटेल्समध्ये बसून जेवण्यावर बंदी करण्यात आली आहे. नागरिकांनी प्रशासनातर्फे काळजी घेण्याचं आणि गर्दी टाळण्याचं आवाहन वारंवार केलं जात आहे.

थोडक्यात बातम्या – 

नवऱ्यानं कापलं बायकोचं ओठ आणि नाक; कारण ऐकून पोलीसही हादरले

सोशल मीडियाबाबत आमिर खाननं उचललं धक्कादायक पाऊल; चाहतेही झालेत हैराण

महाराष्ट्रातुन मध्यप्रदेशात प्रवास करताय तर, कोरोनासंदर्भातील ‘हे’ नवे नियम पाळणं बंधनकारक!

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा’; नवनीत राणांचं अमित शहांना पत्र

तापमान वाढल्यामुळे हिंजवडी परिसरात आग लागण्याचं प्रमाण वाढलं; स्थानिकांनी शेअर केला व्हिडिओ!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More