नवी दिल्ली | चीनच्या वुहानमधून कोरोना व्हायरसने पसरायला सुरूवात केली आणि त्याचं संक्रमण संपूर्ण जगभरात झालं. याचा सगळ्या जास्त फटका अमेरिकेला बसला आहे. दिवसेंदिवस अमेरिकेतली परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सध्याचे सध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लक्ष केलं आहे.
ओबामा यांनी व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांशी आणि त्यांच्याबरोबर काम केलेल्या सहकाऱ्यांशी कॉन्फरन्स कॉलद्वारे संपर्क साधला. यावेळी त्यांनी अमेरिकेतल्या सद्य परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली.
जागतिक संकटात सरकारचं नेतृत्व किती भक्कम असावं लागतं, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे, असं म्हणत त्यांनी ट्रम्प यांना टोला लगावला आहे. ट्रम्प सरकारच्या अस्थिर दृष्टीकोनाला काही प्रमाणात दोष द्यावा लागेल, असंही ओबामा म्हणाले.
अमेरिकेतली कोरोनाची परिस्थिती हाताळताना डोनाल्ड ट्रम्प पार वैतागून आणि गोंधळून गेले आहेत. ट्रम्प यांच्या कमकुवत आणि ढिसाळ प्रतिसादामुळे अमेरिकेची सध्या ही अवस्था झाल्याची टीका ओबामा यांनी केली आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
उरणमध्ये एकाच कुटुंबातील 21 जण कोरोनाबाधित; रायगडची पुन्हा रेड झोनकडे वाटचाल
उद्धव ठाकरे अस्वस्थ, त्यांना अशाप्रकारच्या राजकारणात रस नाही- संजय राऊत
महत्वाच्या बातम्या-
घराच्या बाहेर पडण्यास सक्त मनाई…पुण्यातील कंटेनमेंट झोनसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय
पुण्यात काल दिवसभरात विक्रमी 194 रूग्णांना डिस्चार्ज; पाहा किती नव्या रूग्णांची झालीये नोंद…
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग रूग्णालयात दाखल
Comments are closed.