बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय संघ करणार ‘या’ देशाचा दौरा; BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने केला खुलासा

मुंबई | आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि न्युझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. त्याआधी सरावासाठी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 5 कसोटी सामने खेळणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला आरामाची गरज होती. परंतू आता बीसीसीआयने भारतीय संघाचं वेळापत्रक व्यस्त करत श्रीलंका दौरा आयोजित केला आहे.

जुलैमध्ये आम्ही आयपीएल आयोजित करू शकत नाही, कारण त्या काळात भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध तीन एकदिवसीय आणि पाच टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकतो. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ श्रीलंकेत जाईल, जेथे आयसीसी वर्ल्ड सुपर लीग अंतर्गत ते 3 एकदिवसीय सामने खेळतील, असा खुलासा सौरव गांगुली याने केला आहे.

आम्ही अन्य देशांच्या क्रिकेट मंडळांशी चर्चा करून टी-20 विश्वचषकाआधी आयपीएलचे आयोजन करण्यासाठी  उत्सुक आहोत. अनेक गोष्टी निगडित असल्याने आम्ही त्यावर काम करत आहोत. आयपीएल 2021 चे आयोजन करण्यात आम्ही असमर्थ ठरलो तर जवळपास अडीच हजार कोटी रुपयांचे नुकसान आम्हाला सोसावे लागेल, असं देखील सौरव गांगुली याने सांगितलं आहे.

दरम्यान, इंग्लंड, संयुक्त अरब अमिराती, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी आयपीएलच्या 14 व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्याच्या आयोजनाला हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे आयपीएल प्रशासकीय मंडळ आणि बीसीसीआय सर्व शक्यतांचा विचार करून अंतिम निर्णय घेतील, असं देखील सौरव गांगुलीने सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“कोरोनाच्या संकटातुन बाहेर पडण्यासाठी आता भारताकडे ‘हा’ एकच पर्याय”

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, जाणुन घ्या दिलासादायक आकडेवारी

संसदरत्न पुरस्काराने चार वेळा सन्मानित काॅंग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याची कोरोनावर मात

मुलांमधील ‘या’ लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; बालरोग तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला

धक्कादायक! अभिनेत्री आणि तिच्या बहिणीवर बलात्कार करुन केलं ‘हे’ लज्जास्पद कृत्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More