Top News कोरोना पुणे महाराष्ट्र

सावधान! ‘या’ ठिकाणावरुन पुण्यात यायचं असेल तर कोरोना चाचणी बंधनकारक

Photo courtesy- Pixabay

पुणे | कोरोनाची लाट ओसरल्यामुळे राज्यभरात बाजारपेठा सुरू झाल्या आहे. कोरोनावर लस सुद्धा उपलब्ध झाल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. पण, पुण्यात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढत चालली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेच वातावरण तयार झालं आहे. आणि म्हणून आता पुणे जिल्हा आणि महानगरपालिका क्षेत्रात प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्यात येत आहेत.

मागील आठवड्यात कोरोनो संसर्गची दैनंदिन वाढ साडेसहा ते दहा टक्के इतकी झाला आहे. त्यामुळे शहरात सध्या कोरोना संसर्गाचा दर 10 टक्के झाला आहे. दरम्यान केरळमधून पुणे शहरात येणाऱ्या नागरिकांना RT-PCR टेस्ट बंधनकारक असल्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्वॅब टेस्टलाच RT-PCR या नावाने देखील ओळखल जातं.

सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळली जावी आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच्या सामाजिक अंतराचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी पुण्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी नागरीकांसह  मल्टिप्लेक्स, हॉटेल्स, मॉल्स,आणि मंगल कार्यालयांना ताकीद दिली आहे. नियम मोडल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

नागरीक सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळत नसल्याने पुणे जिल्ह्यात प्रशासनाकडून मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून लग्नसमारंभांवर पुन्हा एकदा निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. स्थानिक प्रशासनाने तशा हालचाली सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. मागच्या वर्षी पुणे जिल्हा हॉटस्पॉट बनला होता. ती वेळ पुन्हा येऊ नये म्हणून यावेळी प्रशासनाकडून कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या

पैशांचा मिटर तुटला… युवराज सिंगला लागलेल्या बोलीचा रेकॉर्ड ‘या’ खेळाडूनं तोडला!

गजानन मारणेला आणखी मोठा धक्का, पोलिसांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

बबब… छप्पर फाडके पैसा!!! ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूला लागली जबरदस्त बोली

‘ते’ ट्विट करणं राहुल गांधींच्या अंगलट, ‘या’ वक्तव्यामुळं अडचणीत!

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच घडतंय असं, ‘या’ महिलेला दिली जाणार फाशी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या