बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सावधान! जर तुम्हीही शेअर करत असाल फेसबूक ग्रुपवर ही माहिती

नवी दिल्ली | सावधान जर तुम्ही फेसबूक ग्रुपवर काहीही शेअर करत असाल. आता फेसबूक जिथे धोकादायक माहिती पसरवली जात आहे अशा ग्रुप्सला मर्यादित करणार आहे. हानिकारक माहिती पसरवणाऱ्या ग्रुप्ससाठी फेसबुकने नवीन नियम जारी केला आहे.

सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात खोट्या आणि फसवणुकीच्या गोष्टी व्हायरल होत असतात. त्यावर निर्बंध आणण्यासाठी फेसबूक मोठ्या पातळीवर काम करत आहे. कारण, खोट्या आणि चुकीच्या माहितीमुळे बऱ्याचदा फेसबूक यूजर्सचं मोठं नुकसान झालं आहे. सद्यस्थिती पाहता तरुणाई यामुळे गुन्हेगारीकडे वळत आहे. यामुळे यावर आता कठोर पाऊलं उचलण्याची गरज आहे असं फेसबुकच मत आहे.

जर फेसबुकवरील ग्रुपने फेसबुकच्या प्लॅटफॉर्मद्वारे तयार केलेले नियम मोडले तर फेसबूक अशा ग्रुप्सवर बंदी घालणार आहे. एवढ्यावरच न थांबता वारंवार नियम मोडणाऱ्या या ग्रुप्सच्या सदस्यांवरही फेसबूक कारवाई करणार आहे. फेसबुकने ब्लॉग पोस्टमध्ये असही म्हटलं आहे की, यामुळे हानिकारक गट एकत्र करणे बंद होईल आणि चुकीच्या घटना टळतील. मात्र, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गटांवर मर्यादा आणल्या जातील.

यापूर्वी फेसबुकने एका निवेदनात सांगितलं होते की, फेसबुकवरचा जर कोणताही गट नियमांच उल्लंघन करत पोस्ट करणार असेल तर अशा लोकांना पुढे पोस्ट करण्यापासून मर्यादित काळासाठी बंदी घातली जाईल. ही मर्यादा 7 ते 30 दिवसांपर्यंत असू शकते. एवढच नाही तर ग्रुपमध्ये नवीन सदस्यांना सहभागीही करू शकणार नाहीत. त्याचबरोबर फेसबुकवर नवीन ग्रुपही तयार करु शकणार नाहीत.

थोडक्यात बातम्या

राज्यातील भाजपच्या या बड्या नेत्याला झाली कोरोनाची लागण

सुर्यकुमारला संधी का दिली नाही हे मला काही कळलं नाही – गौतम गंभीर

न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आलेल्या मराठी अभिनेत्रीने पुन्हा शेअर केले आपले बोल्ड फोटो!

भाजपचे विद्यमान नगरसेवक संजय भोपी यांचं कोरोनामुळे निधन!

अमित ठाकरेंनी शिक्षक आंदोलकांना दिलेला ‘तो’ शब्द पाळला!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More