बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ही’ 3 लक्षणं असतील तर सावध व्हा; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची लक्षणं आली समोर

मुंबई | देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असल्याचं स्पष्ट झालं आहे. मागच्या वर्षीच्या कोरोना लाटीपेक्षा यावर्षी आलेली लाट ही जास्त गंभीर आणि धोकादायक असल्याचं स्पष्ट झालं. कोरोनामध्ये सामान्यतः ताप, थकवा, चव आणि वास घेण्याची क्षमता जाणे या गोष्टींचा समावेश होता. परंतु आता नवीन अभ्यासाद्वारे कोरोनाची नवी लक्षणं पुढे आली आहेत.

चीनमधील एका अभ्यासानुसार नवीन कोरोनाच्या लक्षणांमध्ये पोट, डोळे आणि कानावर परिणाम होत आहे. शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार कोरोनाचा विषाणू डोळ्यात असणाऱ्या एका त्वचेमुळे शरीरात प्रवेश करतो आणि त्यानंतर तो वेगानं फुफ्फुसांपर्यंत पोहोचून शरीरावर गंभीर परिणाम करतो.

कोरोनाच्या नवीन लक्षणांमध्ये ऐकू कमी येणे किंवा ऐकू न येणे ही गंभीर लक्षणे असू शकतात, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं. बर्‍याचशा प्रकरणांमध्ये पोटाच्या समस्याही कोरोनाचे लक्षणं म्हणून दिसून आली आहेत. त्यामुळे कोरोना हा मूत्रपिंड, आतडे आणि श्वसनप्रणालीवर मोठ्या प्रमाणात गंभीर परिणाम करत असल्याचं शास्त्रज्ञांच्या अभ्यासात स्पष्ट झालं आहे.

सुरुवातीला कोरोनाव्हायरसच्या लक्षणांमध्ये ताप, घसा दुखणे, कोरडा खोकला आणि थकवा येणे यांचा प्राथमिकरित्या समावेश होता. परंतु हळूहळू त्यामध्ये बदल होत आता अनेक प्रकारची लक्षणे ही कोरोनाची लक्षणं म्हणून पुढे येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन कोरोनापासून स्वतःचं रक्षण करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या

विकेंड लॅाकडाऊनबद्दल सर्वात मोठी अपडेट, सरकारनं ‘या’ लोकांना दिली सूट

‘परिक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांसह पालकांना ‘हा’ महत्वाचा सल्ला

पुणेकरांनो काळजी घ्या!; कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारी देखील अत्यंत धक्कादायक

“अनिल परबांच्या राजीनाम्यासाठी देखील आता न्यायालयाचे आदेश येण्याची वाट बघावी लागेल का?”

सचिन वाझेंनी केलेल्या आरोपांवर अनिल परब म्हणाले, ‘बाळासाहेबांची आणि माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगतो…’

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More