बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अल्पवयीन मुलाला महानगरपालिका अधिकाऱ्यांकडून मारहाण, पाहा व्हिडीओ

बंगळरू | सगळीकडे कोरोना रोगाने थैमान घातलं असून, दिवसेंदिवस कोरोनाबांधितांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ज्यांच्यात कोरोनाची लक्षणं दिसून येतील अशांची कोरोना चाचणी करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत.

अशातच कोरोना चाचणी करण्यास योग्य पद्धतीने सहकार्य करत नसल्यानं, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी एका अल्पवयीन मुलाला बेदम माहराहण केली असल्याची घटना समोर आली आहे. कोरोनाची कोणतीच लक्षणं नसल्यामुळं तो मुलगा कोरोनाची चाचणी करायची नसल्याचं त्या अधिकाऱ्यांना सांगत आहे. पंरतू तरीही ते अधिकारी त्या मुलाची कोरोना चाचणी करायच्या मागे लागले असल्याचं समजतं आहे.

तसेच या घटनेचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. एका रस्त्यावर कोरोना चाचणी करण्यासाठीचा सेटअप असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे. त्या ठिकाणी तो मुलगा कोरोना चाचणी करण्यास नकार देत असल्यामुळे त्या मुलाला दोन अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूने पकडं असून, त्याला मारत आहेत. 

हे सगळं पाहिल्यानंतर त्या ठिकाणी चाचणी करणाऱ्यांपैकी काही डॉक्टरही उठून गेले असल्याचं दिसून येतं आहे. या घटनेनंतर त्या महानगरपालिका अधिकाऱ्यांवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच राज्या सरकारने कोरोनाची लक्षणं नसल्याल्यांची चाचणी करण्यास नकार दिला आहे. असं असतानाही, ते अधिकारी त्या मुलालावर कोरोना चाचणी करण्यासाठी एवढा दबाव का टाकत आहेत?, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

हृदयद्रावक! माहेरचा निरोप घेणाऱ्या नववधूने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी घेतला जगाचा निरोप

“मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश केल्यास कोणताही दुष्परिणाम होणार नाही”

मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ 18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद; जाणून घ्या

कौतुकास्पद! 5 रूपयांसाठीच्या अपमानामुळे आज ‘ती’ करतीय लोखोंचा व्यवसाय

धक्कादायक! प्रियकरासोबत मिळून आईने केली पोटच्या पोराची हत्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More