मुंबई | कोरोना व्हायरसचा साऱ्या जगभरात वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वत्र सतर्कता पाळण्यात येत आहे. सर्व क्षेत्रांव थेट परिणाम करणाऱ्या या कोरोना व्हायरसची ब्रिटनच्या महाराणीलाही धास्ती असल्याचं कळत आहे.
कोरोनाची दहशत पाहता महाराणी एलिझाबेथ द्वितीयने बकिंघम पॅलेस हा आलिशान महाल सोडला आहे. ज्यानंतर त्यांना विंडसर कॅसल येथे नेण्यात आल्याचं कळतंय.
ब्रिटनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास महाराणी आणि प्रिन्स फिलिप यांना सेंड्रिंगम येथे वेगळं ठेवता यावं यासाठी ही व्यवस्था करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. रविवारी ही अतिशय महत्त्वाची माहिती समजत आहे.
शाही कुटुंबांशी महाराणी आणि प्रिन्स यांची प्रकृती उत्तम आहे. पण त्यांना त्या ठिकाणहून दुसरीकडे नेणं योग्य असल्याचा निर्णय घेण्यात आला. महाराणीसाठी काम करणाऱ्यांमध्ये या व्हायरसची भीती पाहायला मिळत असल्याची माहिती समजत आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
नागरिकांनो घाबरून जाऊ नका, मी बरा झालोय… ऐका कोरोनाग्रस्ताचा अनुभव
कोरोनाची अफवा पसरवणाऱ्यावर पुण्यात गुन्हा दाखल
महत्वाच्या बातम्या-
“…तस आदित्य ठाकरेंना खुश करण्यामध्ये अजित पवारांसह सर्वांचं भलं”
“ब्राम्हण समाजाला दुखवण्याचा माझा उद्देश नव्हता, माझ्या बोलण्याचा रोख संघाकडे होता”
पिंपरी-चिंचवड भागातील आणखी एकाला ‘कोरोना’ची लागण!
Comments are closed.