आमची युती झाल्यानं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची झाेप उडाली- मायावती

आमची युती झाल्यानं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची झाेप उडाली- मायावती

लखनऊ | उत्तर प्रदेशात आमची युती झाल्यानं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची झाेप उडाली आहे, असं मायावती म्हणाल्या आहेत. त्या समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

2019 हे वर्ष भारतीय राजकारणात नवी राजकीय क्रांती घडवणार आहे, असं मायावती यांनी म्हटलं आहे. 

बोफोर्स प्रकरणात काँग्रेसला सत्ता गमवावी लागली तशी भाजपला देखील राफेल प्रकरणामुळं सत्ता गमवावी लागेल, अशी चर्चा देशात सुरु आहेत, असं मायावती यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेससोबत युती केल्यास त्यांच्या पक्षांची मत आम्हाला मिळत नाहीत, त्यामुळं आम्ही त्यांच्याशी युती केली नाही, असं मायावती म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-“आलोक वर्मांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा कोणताही पुरावा नाही, त्यांना हटवण्याचा निर्णय घाईगडबडीचा”

-“जे 60 वर्षात झालं नाही ते गेल्या साडे चार वर्षात झालं”

-दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पुण्याचे मेजर शशीधरन नायर शहीद

-शिवसेनेनं मागणी तर करावी त्यांना काय हवं आहे- रावसाहेब दानवे

-“आम्ही जे वायदे केले होते ते आम्ही पूर्ण केले, भारताच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडतंय”

Google+ Linkedin