धक्कादायक! दारावर पेट्रोल ओतून पत्रकाराचं घर पेटवण्याचा प्रयत्न

बीड | दारावर पेट्रोल ओतून पत्रकाराचं घर पेटवण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना बीडच्या शिवाजीनगरमध्ये घडली आहे. धनंजय गुंदेकर असं या पत्रकाराचं नाव असून ते सायंदैनिक रिपोर्टरमध्ये सहसंपादक आहेत.

शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास अज्ञातांनी त्यांच्या घराच्या दरवाज्यावर पेट्रोल ओतलं आणि आग लावली. धूर घरात आल्यामुळे गुंदेकर कुटुंबियांनी आगीची कल्पना आली त्यांनी आतून पाणी फेकून आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग लावणारे बाहेरुन पेट्रोल ओतत होते.

पेपरमध्ये जास्त लिहितो का?, असं आग लावणारे म्हणत होते. गुंदेकर कुटुंबाने आरडाओरडा केल्यानंतर ते पळून गेले. 

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-आपल्या राजकीय वारसाबद्दल नितीन गडकरी म्हणाले…  

-…पण आधी मला एक किस दे, अनू मलिकने केली होती मागणी; या गायिकेचा आरोप

-एन.डी.तिवारींच्या अंतिम दर्शनात मुख्यमंत्री योगी आणि मंत्र्यांचा हास्यकल्लोळ! व्हिडिओ व्हायरल

-‘जलयुक्त शिवार’चा फुगा फुटला, कुठे आहेत ती १६ हजार गावं? अजित पवारांचा सवाल

-…. अखेर मुहूर्त ठरला; या दिवशी चढणार बाजीराव-मस्तानी बोहल्यावर!

-सदाशिव लोखंडेंना लोकसभेची उमेदवारी जाहीर; शिवसेना प्रमुखांची घोषणा!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या