Top News बीड महाराष्ट्र

बीडमध्ये धक्कादायक घटना; ट्रॅक्टर ड्रायव्हरकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

बीड | शेतातून घरी येत असलेल्या 17 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बीडच्या केज तालुक्यातील सारुकवाडी येथे घडली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर तिच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. नंदकिशोर गीते असं या आरोपीचं नाव आहे.

ट्रॅक्टर ड्रायव्हर असलेल्या नंदकिशोरनं पीडितेला जबरदस्ती कापसाच्या शेतात नेऊन तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर जर कोणाला यासंदर्भात सांगितलं तर जीवे मारण्याची धमकी दिली, असं पीडितेच्या आईनं तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, आरोपीनं याआधीही पीडित तरुणीची छेड काढली होती. मात्र भीतीपोटी तसेच कुटुंबाची बदनामी होईल म्हणून पीडितेनं हा प्रकार आपल्या घरी सांगितला नव्हता. आरोपीविरुद्ध आता बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला कोरोनाची लागण

भाजप आमदार आशिष शेलार यांना धमकीचे फोन!

राज्यपालांची पत्रातील भाषा पाहून धक्का बसला; शरद पवारांचं पंतप्रधानांना पत्र

नाथाभाऊंना राजकारण नीट समजतं, त्यामुळे ते…- देवेंद्र फडणवीस

उद्धव ठाकरे हिंदूहृदयसम्राटांचे पुत्र, त्यांना हिंदुत्वाचे धडे गिरवण्याची गरज नाही- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या