औरंगाबाद महाराष्ट्र

राष्ट्रवादीवाले दुष्काळच विसरले! गटनेत्याच्या वाढदिवसाला धुतला पाण्याने रस्ता

बीड | दुष्काळाने होरपळलेल्या बीडमध्ये आज पाण्याची नासाडी होताना पाहायला मिळाली. बीडमधील परळीत रस्ता स्वच्छ करण्यासाठी हजारो लिटर पाणी ओतण्यात आलं.

राष्ट्रवादीचे परळी नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक कराड यांच्या वाढदिवसानिमित्त परळी नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात येतं आहे. यामुळे रस्ता स्वच्छ करण्यासाठी टँकरने पाणी ओतण्यात आलं.

परळी शहरातून दररोज राखेची वाहतूक सुरु आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यावर राखीचं साम्राज्य दिसून येत आहे. याच राखेची धूळ साफ करण्यासाठी हजारो लिटर पाणी वाया घालवलं जात आहे. गेल्या दोन वर्षात परळीकरांनी भीषण दुष्काळाचा सामना केला. मात्र सध्या पाणीसाठा असल्याने याचं नियोजन करण्यासाठी पाण्याचा अपव्यय होत आहे.

दरम्यान, बीड जिल्हा भीषण दुष्काळी जिल्हा म्हणून ज्ञात आहे. दुष्काळावेळी परळीत तब्बल पंधरा दिवसाला एकदा पाणी मिळायचं. याच परळी शहरात नेत्याच्या दिमतीला लाखो लिटर पाण्याची नासाडी करुन वाढदिवस साजरा केला जातो, अशी टीकाही केली जात आहे.

ट्रेंडिंग बातम्या- 

पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी वर्षाला खर्च होतात तब्बल इतके कोटी!

मोदी सरकारने मांडलेल्या बजेटवर पी. चिदंबरम यांची सडकून टीका

महत्वाच्या बातम्या- 

 ‘अहो…, म्हणून उद्धव ठाकरे सुट्टीवर गेलेत’; नितेश राणेंनी सांगितलं कारण

भारतानं इतिहास घडवला; न्यूझीलंडविरुद्ध ऐतिहासिक मालिका विजय

“गोमूत्र अन् शेणाचं सेवन केल्यास कोरोना व्हायरसचा संसर्ग होणार नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या