बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर

नवी दिल्ली | भारतामध्ये सोन्याला प्रचंड मागणी आहे. यामुळे देशांतर्गत सोन्याचा भाव नेेहमीच गरम असतो. गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव गगणाला भिडले आहेत. यामुळे सोनं खरेदी करणं सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. अशातच आता चीनच्या आर्थिक पेचप्रसंगाच्या शक्यतेमुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर वधारले आहे. त्यामुळे त्याचा परिणाम भारताही दिसून येत आहे.

भारतीय दिल्ली सराफ बाजारात सोन्याचा 47,300 रूपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.एचडीएफ सिक्युरिटीच्यानुसार रूपयाची घसरण हे त्याच्या मागचे कारण आहे. मागील व्यापारात सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 48,010 रूपये होता.
चांदीच्या किंमतीत सुद्धा आज जबरदस्त घसरणीचा कल दिसून आला. दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर काहीच रूपयांनी वाढ न होता 63 हजार 600 प्रति किलो झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किंमतीत तेजी नोंदवली गेली आणि ती 1820 डॉलर प्रति औंसवर पोहचली. तर चांदीचा दर चांदी 22.80 डॉलर प्रति औंसवर स्थिर राहिली आहे.

दरम्यान, दिवाळी ते डिसेंबरपर्यंत सोन्याची किंमत 49 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच आता जे भाव चालू आहेत ते 4 हजार प्रति 10 ग्रॅम वाढू शकतात. त्यामुळे सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतंय.

थोडक्यात बातम्या-

‘…तर आता जम्मू काश्मीरमध्ये स्वस्थ बसून चालणार नाही’; मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य

‘वर्क फाॅम होम’ करताय? तर ‘ही’ गोष्ट केलीच पाहिजे

“साहेब! जो बुंद से गयी वो हौद से नहीं आती”

मोठी बातमी! मनमोहन सिंग यांना डेंग्यूची लागण, प्रकृतीबाबत आली ‘ही’ माहिती समोर

“आम्ही छापा टाकून काटा काढत नाही, काटा काढून छापा टाकतो”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More